तुम्हाला माहिती आहे का?
MSEB ने आपला खिसा कापला आहे ते. कारण हे लोक आकडे मोड अशी करतात की आम्ही काहीच करत नाही. पण खरी गोष्ट काय आहे माहिती का?
तुम्हाला तर माहितीच आहे वेग वेगळ्या युनिट साठी वेगवेगळा चार्ज असतो ते जसे
१-१०० साठी (३.४६ ₹)
१०१-३०० साठी ( ७.४३ ₹)
३०१-५०० (१०.३२)
५०१-१०००(११.७१₹).

आता आपण एक साधारण गणित करू
समजा, मार्च महिन्यात मी अंदाजे तुम्ही ९५ युनिट वापरले तर बिल आले ३९२ ₹( ३२८ ₹ युनिट प्रमाणे (९५×३.४६= ३२८) आणि २०% म्हणजे ६४ रुपये इतर चार्जेस) आणि त्यावेळी अंदाजे रीडिंग आली १५२५७
एप्रिल मध्ये तुम्हाला अव्हरेज बिल दिले ३९२ रुपये
(आपण ३९२ ₹ धरून चालू) परत मे महिन्यात सुद्धा ३९२ ₹ बिल दिले
आता बघा मजा....
जून मध्ये तुमची रीडिंग आली अंदाजे १५५६७. मग तुमची ही रीडिंग मार्च महिन्याच्या रीडिंग मध्ये वजा करून तुम्हाला तेवढी युनिट वीज येणार (१५५६७- १५२५७= ३१० युनिट वीज) आता तुमची वीज युनिट झाले
३१०(३०१-५००च्या मध्ये). तर ते तुम्हाला या रेंज प्रमाणे चार्ज लावणार म्हणजे (३१०×१०.३२=३११९₹ आणि २०% चार्जेस (६३९₹) एकूण झाले ३८३८₹)
यातून सुद्धा एप्रिल आणि मे महिन्यातील बिल वजा करतात मग (३८३८-३९२-३९२= ३०५४). आणि हे ३०५४ रुपयाचं बिल आपल्याला देतात...

थांबा..इथे तुम्ही गंडलात
मार्च आणि जून महिन्याच्या रीडिंगची वजाबाकी आली ३१०. आता या ३१० युनिट मध्ये त्यांनी एप्रिल आणि मे महिन्याचे प्रत्येकी ९५ युनिट वजा करायला पाहिजे होते (३१०-९५-९५= १२० युनिट). आणि १२० युनिट याप्रमाणे ७.४३ ₹ चार्ज करायला पाहिजे.(१२०×७.४३=८९१ आणि २०% चार्ज ) एकूण झाले १०६९ रुपये.
परंतु ते आले ३०५४ ₹
म्हणजेच ३०५४-१०६९ = १९८५ ₹ आपल्या खिशातून चोरले... 💯
You can follow @Theprasad_2001.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.