मुंबई मनपा निवडणूक..

वर्ष २००७
शिवसेना - ८३
भाजपा - २८
राष्ट्रवादी - १४
काँग्रेस - ७३

वर्ष २०१२
शिवसेना - ७५
भाजपा - ३१
राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ५२

वर्ष २०१७
शिवसेना - ८४
भाजपा - ८२
राष्ट्रवादी - ९
काँग्रेस - ३१

हे आकडेच बोलके आहेत. मुंबईत भाजपा किती आणि कशी वाढत आहे, +
हे कळण्यासाठी ह्यापेक्षा वेगळं काही नकोय.

शिवसेना ७५ - ८४, मध्येच राहिली आहे. भाजपा २८ पासून ८२ पर्यंत गेली आहे. ह्यामध्ये काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झालीये. आणि नंतर त्यांनी मुसंडी मारली असलं काही झालं नाहीये. त्यांचा आलेख अधोगतीचाच दिसतोय. राष्ट्रवादी मुंबईत फारशी नाही. +
म्हणजे काँग्रेसचा जो परंपरागत मतदार आहे, ज्याला शिवसेना नको होती तो भाजपाला मतदान करतोय. आता शिवसेनेच्या ह्या दगाबाजीमुळे दुखावलेला त्यांचा मतदार नक्कीच भाजपाकडेच खेचला जाईल कारण तो काँग्रेस वा राष्ट्रवादीला मतदान करेल असं वाटत नाही. संपादक कितीही बोंबलले तरीही सेना म्हणजे +
मराठी अस्मिता हे असलं फसवं समीकरण राज्यात चाललेले नाहीये. मुंबईत सुद्धा चालणार नाही.

२०१४ नंतर केवळ केंद्रातील वा राज्यातीलच नव्हे तर बऱ्याच स्थानिक निवडणुकांतसुद्धा ज्यापद्धतीने भाजपाने मुसंडी मारलेली आहे, ती पाहता आणि वरील आकडेवारी पाहता आगामी निवडणूक भाजपा एकहाती खिशात +
घालेल ह्यात शंका नाहीच. फक्त उत्सुकता आहे ती आकड्याची..

गेल्या मनपा निवडणुकीत हमखास निवडून येणाऱ्या जागांवर भाजपने युतीधर्म सांभाळत पाणी सोडलं होतं. आता खऱ्या अर्थाने 'दोन दोन' हात करताना 'भाजपा वि. सगळे' असं लढताना सामान्य मुंबईकर, जो ह्या मविआचा नंगानाच उघड्या डोळ्याने पाहात +
आहे आणि ज्याने भाजपच्या राज्यात मुंबईला आणलेले विकासप्रकल्प पाहिले आहेत, ज्याला मेट्रो किंवा बुलेट ट्रेन हवी आहे, ज्याला आता "पर्याय" हवा आहे, तो भाजपाला भरभरून मतदान करेल ह्यात मलातरी शंका वाटत नाही..

पाहुयात..

- चेतन दीक्षित
You can follow @mechetandixit.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.