ममता बॅनर्जी- आदर्श विरोधी पक्षाच्या नेत्या ते बेलगाम सत्ताधारी.
ममता बॅनर्जी यांचा जन्म ५ जानेवारी१९५५ रोजी कलकत्त्याला झाला. त्या शिक्षणाने वकील आहेत. ममता दीदी अविवाहित आहेत. ममता दीदी पण अनेक नेत्यांप्रमाणे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी आहेत. (१+)
ममता बॅनर्जी यांचा जन्म ५ जानेवारी१९५५ रोजी कलकत्त्याला झाला. त्या शिक्षणाने वकील आहेत. ममता दीदी अविवाहित आहेत. ममता दीदी पण अनेक नेत्यांप्रमाणे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी आहेत. (१+)
दीदी राजकारणात खूप कमी वयात सक्रिय झाल्या. सुरुवाती च्या काळात काँग्रेस पक्षात सक्रिय झाल्यावर त्या डाव्यांना थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम त्यांचे काँग्रेस पक्षात राजकीय वजन वाढू लागले. त्यातून त्या पूर्वीपासून सामान्य लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये (२+)
रमणाऱ्या असल्याने त्याचा पण फायदा त्यांना खूप झाला. तो फायदा इतका झाला की १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जादवपूर मतदार संघातून डाव्यांचे दिगज नेते कॉम्रेड सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव करून त्या जायंट किलर बनल्या. १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आयुष्यात एकदाच त्यांना पराभवाचा (३+)
सामना करावा लागला. त्यानंतर १९९१ ते २०११ सलग वीस वर्षे त्या कोलकता दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत करत राहिल्या. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव सरकार मध्ये दीदी मानव संसाधन विकास खात्याच्या राज्यमंत्री बनल्या परंतु लौकरच त्यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला. (४+)
तिथून पुढे १९९६ साली त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करायला सुरुवात केली. १९९७ साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून ओल इंडिया तृणमूल काँग्रेस ची स्थापना केली. चमत्कारिक रित्या १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये सामील झाल्या. आणि रेल्वे मंत्री बनल्या. (५+)
ममता दीदी देशाच्या पहिल्या महिला रेलमंत्री आहेत. २००० साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि काही स्पष्टीकरण न देता तो परत पण घेतला. त्या केंद्रात मंत्री होत्या पण त्यांचे सर्व लक्ष पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री पदावर होते. २००० सालच्या असेंबली निवडणुकीत (६+)
त्यांनी बराच प्रयत्न केला पण डाव्या आघाडी समोर त्यांचा टिकाव लागला नाही. २००० सालची निवडणूक पहिली अशी निवडणूक होती ज्याच्यात डाव्या पक्षाचे अर्धव्यु ज्योती बसू मुख्यमंत्री बनणार नव्हते म्हणून दीदींनी सगळी ताकद पणाला लावली पण उपयोग झाला नाही.(७+)
२००४ मध्ये त्या एन डी ए सरकार मध्ये पुन्हा आल्या पण निवडणुकीत एन डी ए चा पराभव झाला आणि दीदी विरोधी पक्षात बसल्या. पश्चिम बंगाल चे राजकारण नेहमी रक्तरंजित राहिले आहे. राज्यात सत्ता मिळवायची असेल तर मार खावा लागेल अनेक कार्यकर्त्यांचे बळी पण द्यावे लागतील (८+)
हे दिदींना चांगले माहिती होते. दीदींनी डाव्यांच्या सरकारला आणि हिंसेला रस्त्यावर उतरून विरोध केला पण त्यांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. दिदींना यश मिळणार होते सिंगुर, नंदीग्राम आंदोलना नंतर. टाटा ग्रुप ने आपला बहुचर्चित नेनो प्रकल्प सिंगुर आणि नंदीग्राम मध्ये करायचे ठरवले (९+)
पश्चिम बंगाल च्या डाव्या आघाडी सरकारने टाटा ग्रुप ला जमीन संपादित करून दिली. ह्या प्रकल्पाला काही स्थानी शेतकऱ्यांचा विरोध होता. नेमकी ही संधी ममता दीदींनी साधली. तृणमूल काँग्रेसने नेनो प्रकल्प हलवण्यासाठी टोकाचा विरोध केला. त्या आंदोलन दरम्यान दीदींनी आमरण उपोषण (१०+)
पण केले. दीदी आणि त्यांच्या पक्षाने प्रकल्प हटवण्यासाठी सगळी ताकद पणाला लावली. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला टाटा ने आपला प्रकल्प बंगाल च्या बाहेर नेण्याचे ठरवले. पण ह्या सगळ्यात डाव्या सरकार विरोधात सामान्य लोकांमध्ये राग घुमसू लागला. त्याला नंदीग्राम मधले स्टेट स्पॉन्सर्ड (११)
हत्याकांड विशेष कारणीभूत होते. २००७ च्या मार्चमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर नंदीग्राम प्रशासना कडून गोळीबार करण्यात आला त्या गोळीबारात २० लोक मृत्युमुखी पडले तर शेकडो लोक जखमी झाले. टाटा प्रकल्प बंगाल मधून गेला आणि ममता दीदी लोकप्रिय नेत्या बनल्या. (१२+)
२००९ साली वाऱ्याची दिशा ओळखून दीदी काँग्रेस प्रणित यु पी ए मध्ये सामील झाल्या. पुन्हा एकदा रेलमंत्री बनून पण त्यांचे सर्व लक्ष गृहराज्य पश्चिम बंगाल च्या २०११ साली होणाऱ्या असेंबली निवडणुकी वर होते. डावी आघाडी पश्चिम बंगाल मध्ये सलग ३४ वर्ष सत्तेत होती (१३+)
प्रस्थापित विरोधी लाटेचा जबर सामना डाव्या आघाडीला करावा लागणार होता. डाव्या आघाडीच्या ३४ वर्षाच्या शासनात ज्योती बसू हे सलग २९ वर्ष मुख्यमंत्री होते. (हा एक विक्रम आहे) त्यांच्या नंतर मुख्यमंत्री झालेल्या बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे करिष्मा नव्हता. (१४+)
सिंगुर, नंदीग्राम घटने नंतर डाव्यांना हरवण्यासाठी राज्यातली जनता जणू वाटच बघत होती. दीदींनी निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली. काँग्रेस सोबत निवडणूकपूर्व आघाडी केली. आणि ममता दिदींचा पक्ष निवडणूक मोठ्या फरकाने जिंकला. डाव्यांचा ३४ वर्ष अभेद्य असलेला किल्ला दीदींनी अक्षरशः (१५+)
उध्वस्त करून टाकला. राज्यातील जनतेचा डाव्या आघाडीवर एवढा रोष होता की तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य स्वतः आपल्या मतदारसंघातून पराभूत झाले. २०/५/२०११ ह्या दिवशी ममता दीदी पश्चिम बंगाल च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. (१६+)
ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर राजभवन मधून रायटर्स बिल्डिंग (पश्चिम बंगाल चे मंत्रालय) चालत जाऊन स्वतःची एक शपथ पूर्ण केली. १९९३ साली एका दिव्यांग बलात्कार पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू ह्यांच्या केबिन च्या बाहेर तीन तास (१७+)
धरणे दिले होते. तेव्हा स्थानिक पोलिसांनी ममता दीदी आणि बलात्कार पिडिता दोघांनाही मारहाण करून हाकलून लावले होते. तेव्हा राज्याचे गृहमंत्री होते बुद्धदेव भट्टाचार्य. त्याच दिवशी दीदींनी शपथ घेतली होती की 'पुन्हा रायटर्स बिल्डिंग मध्ये पाऊल ठेवेल ते मुख्यमंत्री बनुनच. (१८+)
तब्बल १८ वर्ष त्या कधीच रायटर्स बिल्डिंग मध्ये गेल्या नाहीत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राजभवन ते रायटर्स बिल्डिंग आपल्या हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यां सोबतच गेल्या.
समाप्त
समाप्त