साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसाय विस्तार करत असताना मुंबई आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो.
इकडचे जागेचे दर ऐकून आम्हाला हादरा बसत होता, ROI यायलाही पाच वर्षाचा काळ त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय याची भीती वाटत होती.
#SaturdayThread #BusinessDots #मराठी #म १/१२

फॅक्टरी, मशीनरी, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा आणि “आपली २४ उपलब्धतता” यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असणे याला प्राथमिकता देत होतो पण मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नव्हते या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आणि तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली की प्रकल्प
२/१२
२/१२
पुण्यात जर टाकला तर बराच खर्च कमी होईल.
तेंव्हा पुण्याला फॅक्टरी ही तशी परीक्षाच होती. या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला तरी मॅन्युफॅक्चरींग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि त्यात जर एखादी जरी चूक घडली तरी तुम्ही सहज संपून जावू शकता.
त्यातही त्यातली गुंतवणूक, दगदग आणि ३/१२

इतर मानसिक त्रासाचे तोटे लक्षात घेता तो यशस्वी होईलच याची मला खात्री नव्हती.
त्यावेळी आमच्या एका अनुभवी स्नेह्यांनी मला न डगमगता पुढे जाण्यास सांगितले.
ते म्हणाले, - "तुम्ही १००% यशस्वी होणार, अजिबात अडचण येणार नाही. स्थानिक पातळीवर काहीही लागले तर मी तुमच्यासोबत आहे." ४/१२

बरं त्यांचा अनुभव आणि दरारा पाहता मला ते नक्कीच आधाराचे आणि उभारी देणारे बोल ठरले.
दुसऱ्याच दिवसापासून आम्ही सर्वजण कामाला लागलो. जागानिश्चिती, मशिनरी खरेदी, त्याचे प्लान, सरकारी परवानग्या, कामगारभरती आणि प्रत्यक्ष कामाला सुरूवात हे सर्व काही पार पडले फक्त दोन महिन्यात! ५/१२

यादरम्यान मी स्वत:च पुण्यात सहा ते आठ महिने सलग तळ ठोकून राहीलो... सर्व गोष्टी बारकाईने आणि सर्व सिस्टम आपल्याला हवी तशी तयार केली.
यादरम्यान बरेच कष्ट घ्यायला लागले, चढ-उतार आले पण शेवटी त्याचे परिणाम सकारात्मकच आले.
या दरम्यान कायम ते वाक्य - तुम्ही १००% यशस्वी होणार, ६/१२

आणि काहीही लागले तरी मी सोबत असेन” हे वाक्य कायम मला स्फुर्ती आणि आत्मविश्वास देत आलेय.
हा प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी, जेव्हा जेव्हा मी व्यवसाय विस्ताराचा विचार करायचो तेव्हा मी एखाद्या मोठ्या संकटात उतरत असल्यासारखा घाबरलेला, बावरलेला असायचो, पण या अनुभवानंतर मात्र , ७/१२

संपुर्णपणे झोकून देऊन काम करायला शिकलो. चांगले काम करताना आपले काही लोक नक्की आपल्यामागे आहेत हा आत्मविश्वास त्यातून मिळाला!
बर्याचदा असे असते की आपल्याला कोणीतरी फक्त खांद्यावर हात ठेऊन नैतिक आधार द्यायची आवश्यकता असते. अशा काही देवमाणसांची EcoSystem आपण तयार करत जायला ८/१२

हवे जे लोक आपल्याला नेहमी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील. लढाईला खरोखर सोबत असतील. ते आपल्या आणि आपण त्यांच्या कुटूंबाचा भाग बनून जातील.
खाजगी असो की व्यावसायिक, माझ्या आयुष्यात तरी हे लोक म्हणजे माझी खरी immune system आहे.
कोणत्याही भितीपासून माझे रक्षण हेच लोकं करतात.९/१२

खांद्याला खांदा लावून सोबत उभे असतात.... प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही लोकं असतात, ते काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खुप काही करतात, बऱ्याचदा आपल्या आयुष्याला ते कळतनकळत आकार देतात.
अशी लोक आपल्या आजूबाजूस तयार करा त्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे १०/१२

एकमेकांना मदत करत राहणे. फक्त स्वार्थ ठेऊन किंवा उपयुक्तता आहे म्हणून ते संबंध न जपता मनापासून, प्रामाणिकपणे काम करताना दिसेल त्याला आपल्याला जी शक्य होईल ती मदत नक्की करा.
हे वर्तुळ वाढेल तसे आपण माणूस म्हणून जास्तीत जास्त श्रीमंत होत जावू.
११/१२

ही माणूसकीची श्रींमतीच पुढे आयुष्य सुखकर करते, समृद्ध करते.
आभार आणि धन्यवाद
#SaturdayThread #BusinessDots #मराठी #माणुसKey १२/१२