कॉम्रेड दिएगो मॅराडोना ची शोकांतिका :

अर्जेंटिना संघाने मेक्सिकोमध्ये विश्वचषक जिंकल्याच्या अवघ्या एका वर्षात १९८७ मध्ये दिएगो मॅराडोना प्रथम क्युबाला गेला आणि क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या पहिल्याच भेटीत बळी पडून कॉम्रेड मॅराडोना बनला.
(1/17)
एकदा का एखादा माणूस कॉम्रेड बनला की त्या माणसात कसे बदल होतात याचे उदाहरण मॅराडोना.

पहिल्याच भेटीत कॉम्रेड मॅराडोनाचे फिडेल कॅस्ट्रो बरोबर राजकीय, भावनिक व वैयक्तिक नाते घट्ट झाले.मॅराडोना क्युबाला वारंवार भेट देऊ लागला.
(2/17)
तिसऱ्या चौथ्या भेटीतच फिडेल कॅस्ट्रो हे ‘माझे नवीन वडील’ असल्याचे मॅराडोना जाहीररित्या अभिमानाने सांगू लागला. कॉम्रेड बनताच मॅराडोनने बाप बदलला.

फिडेल कॅस्ट्रोच्या संपर्कात सातत्याने आल्याने मॅराडोनाने साम्राज्यवाद विरोधी आणि डाव्या मतांची विधाने करायला सुरूवात केली.
(3/17)
त्यानंतर, 'आयडिओलॉजी फर्स्ट, बाकी सगळं लास्ट' हा कम्युनिस्ट मंत्र त्याने शेवटपर्यंत पाळला. कॉम्रेड मॅराडोनाने डाव्या पायावर फिडेल कॅस्ट्रो आणि उजव्या हातावर चे गवेरा चे टॅटू पण गोंदवून घेतले आणि त्याचा भरपूर शो-ऑफ केला.
(4/17)
जगभरात करोडोच्या संख्येत असलेल्या त्याच्या मूर्ख फॅन्सने हे 'क्रांतिकारक' कोण आहेत हे न समजून घेताच आपापल्या अंगावर चे आणि कॅस्ट्रो गोंदवून घेतले. आपल्या फालतू थर्ड-क्लास दैवतांचं पद्धतशीर ग्लोरिफिकेशन कसं करायचं हे कम्युनीच जमातीला बरोबर माहीत असतं.
(5/17)
दुटप्पीपणाचा जर पेटंट असता तर तो कम्युनिजमलाच मिळाला असता. स्वतःच्या चिटिंग ला 'हॅन्ड ऑफ गॉड' असं म्हणत असलेल्या कॉम्रेड मॅराडोनाने आपल्या आत्मचरित्रात मात्र 'यश कठोर आणि प्रामाणिक परिश्रमांमुळे घडते. नशिबाचा आणि देवाचा यशी काही एक संबंध नसतो' असं लिहिलंय.
(6/17)
मॅराडोना कॅस्ट्रोला भेटायच्या आधी एक धार्मिक वृत्तीचा कॅथलिक ख्रिस्ती होता. कॅस्ट्रोला भेटल्यानंतर मॅराडोनाने पोपशी संपर्क साधून तो व्हॅटिकन चर्च बघायला गेला. तिकडून बाहेर येऊन मॅराडोना बोलला - “मी व्हॅटिकनमध्ये गेलो. सोन्याने मढलेले ते छप्पर पाहिले.
(7/17)
मनात आले,सोन्याच्या छपराखाली राहिलेली कुत्र्याची अवलाद गरीब देशांत जाऊन पूर्ण भरलेल्या पोटाने गरीब मुलांचे चुंबन कसे काय घेऊ शकते?” झक मारली व याला बोलावलं अशी पोपची अवस्था झाली होती.पोपला वाटलं होतं की येशूचं लेकरू येतंय पण आलं कॅस्ट्रोचं लेकरू. बरोबर गेम केली तिकडे जाऊन.
(8/17)
बऱ्याच गरीब पाववाल्यांना मॅराडोनाचं हे मत पटलं व परिणामी लॅटिन अमेरिकेतल्या देशांतील असंख्य तरुण लाल बावट्याखाली जमा झाले.

सर्व प्रकारची वायझेडगिरी करायचे लायसन्स कॉम्रेड जमातीला असतंयच. मॅराडोना त्याला अपवाद नव्हता. त्याच्याही सगळ्या रिकाम्या उचापतींची यादी खूप मोठी आहे.
(9/17)
डाव्या विचारसरणीचा अंगिकार आणि राईट-विंग लोकांचा द्वेष, कम्युनिस्ट हुकूमशाहीचे समर्थन, जगातील लोकशाहीच्या मार्गाने जनतेतून निवडून आलेल्या सरकारांना विरोध, क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो आणि व्हेनेझुएलाच्या ह्युगो चावेजला आदर्श मानणे,
(10/17)
लिबियाचा हुकुमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफीचे समर्थन, सीरिया पॅलेस्टाईन आणि इराक चे समर्थन करत अमेरिकेला आणि इस्त्राईलला विरोध अशा अनेक गोष्टी यात आहेत. मूर्खपणाचा कळस म्हणजे मॅराडोना बंगाली कम्युनिचांच्या नादाला लागून कॉम्रेड सुभाष चक्रवर्तीच्या अमंत्रणावर बंगालमध्येही आला.
(11/17)
इथे येऊन इकडच्या अर्धवट लाल माकडांना पाठिंबा देऊन गेला होता. हे सगळं आपल्या आयडिओलॉजीसाठी आणि जगभरातील गरिबांसाठी करतो असं म्हणत असणारा मॅराडोना जगभर 'मोहिमांवर' जात असे तेंव्हा प्रत्येक वेळी जाहीर कार्यक्रमात आपलं तोंड दाखवायचे ऑर्गनाजर्स कडून तब्बल २२ लाख रुपये घेत असे.
(12/17)
बऱ्याचदा हे पैसे ज्या गरिबांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला मॅराडोना जायचा, त्यांच्याच वर्गणीतून गोळा व्हायचे.

आपला 'आयडीओलॉजीकल चॉईस' चुकला व ती चूक वेळीच लक्षात आली तर आपण बाहेर येऊ शकतो. पण आपण चुकत आहोत हे मान्य न करता तो तेच काम आणि तीच विचारसरणी तशीच रेटू लागला.
(13/17)
मग आधी फ्रस्ट्रेशन आणि कालांतराने डिप्रेशन आले. शेवटी, ड्रग्स घेऊन आपल्या चुका विसरायचा प्रयत्न केला तरीही ते करता आले नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॉम्रेड मॅराडोना!

कम्युनिजम ही अफू ची अशी गोळी आहे.
(14/17)
जी तुम्ही कोणालाही दिली की ते वर्गवीहीन समाज, गरिबांचे शोषण, श्रीमंतांची गुलामी, निळी कॉलर, अत्याचार, भांडवलशाही, क्रोनी कॅपिटलिस्ट, गरिबी, मजदूर, हक्क, जल, जमीन, जंगल, क्रांती सारखे शब्द प्रत्येक वाक्यात वापरू लागतात!"- कार्ल मार्क्स, दास कॅपिटल (ओरिजिनल असं होतं- सूत्र)
(15/17)
मॉरल ऑफ दि स्टोरी : जर तुम्हाला कुठेही डाव्या विचारसरणीचे बॉलिवूड सिलेब्रिटी,खेळाडू, लेखक, पत्रकार, राजकारणी, विचारवंत 'आजादी', 'क्रांती' वगैरे बरळताना दिसले, तर जास्त लोड घेऊ नका. ते लवकरच एक तर डिप्रेशम मध्ये जाऊन किंवा ड्रग्स घेऊन एखाद्या रिहॅब सेन्टर मध्ये दिसतील.
(16/17)
कार्ल मार्क्स च्या अफूचा ओव्हरडोज झाल्याने कॉम्रेड मॅराडोनावर तीच वेळ आली.

- वेद कुमार यांच्या सौजन्याने

"ज्याने कार्ल मार्क्स वाचला तो एक अतिशय निष्ठावान कम्युनिस्ट बनतो. ज्याला कार्ल मार्क्स समजला तो अतिशय कट्टर कम्युनिस्ट-विरोधी बनतो!"- रोनाल्ड रेगन, माजी पोटस
(17/17)
You can follow @LakhobaLokhande.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.