१. जातीभेद विरहीत समधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे मनुवाद विरोधी धर्मनिरपेक्ष कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🙏
जागतिक आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाला धर्माशी जोडून संकुचित करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी महत्वाचे मुद्दे ...
२. समता समानता- शिवरायांनी भेदाभेद केला नाही. महार समाजातील रायनाकला पाटील केलं.रामोशी समाजातील बहिर्जी नाईकला गुप्तहेर खात्याचे प्रमुख, हंबीरराव मोहिते सरसेनापती, जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले.माळी, धनगर, मातंग, महार, कोळी,आग्री, शेणवी, मुस्लिम या सर्वांना हक्क दिले
३. शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचवणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील मंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभार व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले.
४. समधर्मसमभाव- शिवाजी महाराजांनी मस्जिद पाडली नाही. तर मस्जिद बांधून दिली.
रायगडावर राज्याभिषेक तयारीसाठी अनेक इमारती बांधल्या जात होत्या. त्यावेळी जगदीश्वराच्या मंदिराबरोबरच महाराजांच्या महालासमोर आपल्या सैन्यातील मुस्लिम सैनिक व सरदारांसाठी मस्जिद बांधली.
५. संत तुकाराम महाराजांप्रमाणेच रत्नागिरीतील केळशी गावचे बाबा याकूत हे त्यांचे गुरू होते. त्यांच्या दर्ग्याला ६५३ ए जमीन आज्ञापत्राने दिली व दर्ग्याचे बांधकाम महाराजांनी सुरु केले. अशी अनेक उदाहरणे आहेत ‌ शिवरायांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते. 27 अंगरक्षकांपैकी 10 मुस्लिम होते.
६.त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर मोहम्मद, आरमार प्रमुख दर्या सारंग व दौलतखान मुस्लिम होते. हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ हिंदूंचे नव्हते.औरंगजेबालाही महाराजांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले. नूरबेग, काझी हैदर, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम, वाहवा खान महाराजांचे स्वामीभक्त सेवक होते.
७/७ शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे व काका शरीफजी यांची नावे त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफजी यांच्या नावावरून ठेवले. यातून शिवरायांचा पूर्ण परिवार धर्मनिरपेक्ष होता हे स्पष्ट होते.
You can follow @sachin_inc.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.